Saturday, December 22, 2007

शोधायला मला माझ्या गावी येशील का???

माझी कविता...... माझा गाव....
आकाश-तुकडे....उंच झाडे...घेतात तळ्याचा ठाव...
घुटमळणारा प्रकाश-तरंग...तळ्याचा रंग...आसमानी हिरवा....
तुही बघितला असशील स्वप्नात परवा.....

येशील??? माझ्या कवितेत???
तिथे सापडतील फुलांविना फुलपाखरे...
लाजरे-कोवळे...गवत... नाचरे...
दवांत भिजली पायवाट....
दुर जाते पर्वतात....

तळ्याच्या काठी....पाण्यात पाय सोडूनी बसशील का?
हात-हातात घेशील का?
जवळी मला घेशील का?
त्या क्षणाचं मागणं.... काही न बोलणं!!!!
पाण्यावर तरंगत असतील तुझ-माझ्या शब्दांचे थवे....
सापडतील पंखात मिटले वेडे रावे....

तुझ्यात असलेलं....माझं अस्तित्व....
तरी वेगळं नाव असलेलं....
जसं पाण्यात अत्तर मिसळलेलं....
सांभाळशील का.....
शोधायला मला माझ्या गावी येशील का???

1 comment:

प्रशांत said...

सुंदर तनुजा बाई मस्त लिहीलय...