Wednesday, August 19, 2009

पाऊलवाटा

आठवनिंच्या झोक्यावर आज घेतला मी विसावा
अजूनही शोधाते आहे प्रेमाचा तों हरवलेला
ओलावा आज मज पाशी आहेत अनेक नातिगोती
अजूनही जपून ठेवल्यात मी जुन्या चालीरीती


अजूनही आहे माझा गुलमोहर फुलेला
त्याचा सुगंध मनात खोलवर मुरलेला
मन् तरंगते त्या निळ्या नदीच्या काठी
जिथे कोणीही जीव लावे कोणा साठी

आठवतों प्रेमाचा तों हिरवाकंच गालीचा विणलेला
मुलायम रेशमी धाग्यानी प्रत्येक नात्यात
गुंतलेला एके दिवशी मी परत तिथेच येइन
प्रेमाची ती पालवी परत घेउन जाइन

जीवनाच्या वाटेवर आज मी खुप पुढे आले
आपल्या माणसात असुनही परकी झाले
अजुन खुप चालायचे आहे निरोप घेते मी आता
पहायचे आहे कुठवर नेतात नशिबाच्या पाऊलवाटा

Sunday, June 7, 2009

प्रेम कधी मागून मिळत नाही......

प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं...

रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,
तू जवळ हवासा वाटतो
खूप दूर आहेस,हे सांगून जातं...

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...

माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलास
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?

का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का "प्रेम" म्हणावे?

असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघिनाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांत येत नाहीत...

Thursday, April 16, 2009

स्वप्न

स्वप्न

डोळे मीटले की
जगाशी संपर्क संपलेला असतो
रम्य निसर्गात मनाचे पाउल
कारंजे थुई थुई,समीरा ची धून
ओंजळीत जमा होणारा फुलोरा
आकाश दुलईचा डोलारा
छ्म छ्म नाचते उन
तुझ्या येण्याची चाहूल
प्रभात येते देऊन हुल
पहाटेच स्वप्न होत
खर होत अस एकलय………….

Monday, March 23, 2009

आठवणींचे भास्

नेहमी प्रमाणे डोळे माझे मिटायला तैयार नव्हत
कितीही समजावले तरी तिलाच शोधत होते.... 

तिचाच विचार करताना लागला डोळा चुकून, 
स्वप्न ते होते की नव्हते दिसे ती इथून तिथून....

मिटलेल्या डोळ्यांपुढे दिसते ती छोटी परी, 
नाजुक हात पसरलेले, बोलावताना मला घरी....

डोळे किती निरागस तिचे, ओठांवर मोहक हसू, 
समजेना मला माझ्या, डोळ्यात हे का आले आसू?

कठिन परीक्षा आहे तुझी ही, 
समजावले मग मीच मनाला, 
गवसणी घालण्या आकाशा, 
बीज घेते आधी गाडून स्वताला....

Wednesday, March 18, 2009

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण


कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाह

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

Tuesday, February 17, 2009

आहेस तू सावरायला
म्हणून पडायला ही आवडत..........................

आहेस तू मनवायला
म्हणून रुसायला ही आवडत.........................

आहेस तू रडायला
म्हणून रडायला ही आवडत.................

आहेस तू समजून घ्यायला
म्हणून चुकायलाही आवडत.........................

आहेस तू पाहायला
म्हणून सजायला ही आवडत.........................

आहेस तू ऐकायला
म्हणून बोलायलाही आवडत.....................

आहेस तू सोबतीला
म्हणून जगायलाही आवडत...........................