Saturday, December 22, 2007

विदेशी कपडे घातले तरी,
ह्य्र्द्य अजुन मराठी आहे,
तोडून तुटत नाहीत,
या मजबूत रेशिम गाठी आहेत

पिज्जा, बर्गर खाल्यावारही,
पोट पुरंपोलीच मागत
इंग्रजी पुस्तक वाचली
तरी मन मराठी चरोलीच मागत

मातृभूमि सोडली की
आइपासून दूर गेल्यासारख वाटत,
भाषा सोडली की,
अस्तित्व हरावाल्यासरख वाटत

वडाची जाड़ मोठी होउनाही
परत मात्रुभुमिकडे जुकतात
कितीही दूर गेल तरी
पाय परत मात्रुभूमिकडे वलतात........

post scrap cancel
मैत्री तुजी अशी असावी,
आयुष्यभर सोबत रहावी,
नको कधी त्यात दुरावा,
नेहमीच नवा फुलोरा,
मैत्री अपुली अशी असावी,
सर्वाना एकत्रित अनावी,
हँसाने रुसने चालत रहावे,
एकमेकाना समजून घ्यावे,
मैत्री आपण अशी जगावी,
एकमेकाना आधार असावी,
सुख दुखत नेहमी सोबत असावी,
असे हे आपले मैत्रिचे नाते,
नेहमीच जपावे...............

post scrap cancel

शोधायला मला माझ्या गावी येशील का???

माझी कविता...... माझा गाव....
आकाश-तुकडे....उंच झाडे...घेतात तळ्याचा ठाव...
घुटमळणारा प्रकाश-तरंग...तळ्याचा रंग...आसमानी हिरवा....
तुही बघितला असशील स्वप्नात परवा.....

येशील??? माझ्या कवितेत???
तिथे सापडतील फुलांविना फुलपाखरे...
लाजरे-कोवळे...गवत... नाचरे...
दवांत भिजली पायवाट....
दुर जाते पर्वतात....

तळ्याच्या काठी....पाण्यात पाय सोडूनी बसशील का?
हात-हातात घेशील का?
जवळी मला घेशील का?
त्या क्षणाचं मागणं.... काही न बोलणं!!!!
पाण्यावर तरंगत असतील तुझ-माझ्या शब्दांचे थवे....
सापडतील पंखात मिटले वेडे रावे....

तुझ्यात असलेलं....माझं अस्तित्व....
तरी वेगळं नाव असलेलं....
जसं पाण्यात अत्तर मिसळलेलं....
सांभाळशील का.....
शोधायला मला माझ्या गावी येशील का???
विरहाचे दोन क्षण कधी,
तू ही अनुभवुन बघ,
कधीतरी कातरवेली तू ही,
मला आठवून बघ,
कदाचित तुला समजून येइल,
विरहाचे दुख काय असते,
प्रिय व्यक्तिच्या जन्याने,मनात काय खलबल माजते..........

post scrap cancel

शाळेचे दिन सोन्याचे..............

अजुन थोडा वेळ आहे म्हणता म्हणता
वेळ ती निघून गेली

शाळेची आठवण येऊन
पापणी ओलि झाली

त्या दिवशी खूप रडले
जेव्हा शाळेत पहिल पाऊल ठेवल होत

अश्रू ही आवरत नव्हते जेव्हा शाळेने
निरोप समारंभाला बोलावल होत

भिंती त्या सांगत होत्या विसरू नका आम्हाला
आत्मविश्वासाने तुमच्या जिंका सार्‍या जगाला

तेव्हाच शाळेला संगितल तू दिलस जे बाळ कडू
त्याच्याच जोरावर आता यशाची शिखरे चढू.......................

माझी आई .......!!!

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे,
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे,
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे,
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे,
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे,
जिच्यामुळे मी, माझी कविता आहेती माझी......माझीच फक्त आई आहे.

Friday, December 21, 2007

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या,
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे,
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी,
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही,
अनूभवलाय वेगळाच गोडवा,
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात,
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां,
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस,
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो,
आई, किती तू कळवळली होतीस,
एक धपाटा घालून पाठीत,
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली,
तो धपाटा, ती फुंकर, ती माया,
ती हरेक आठवण मनात

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाहीआई,
लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरीतू मला शोधून काढशीलआई,
तुला एकदाच हाक दिली,
तरी अब्जांनी धावून येशील
मैत्री हा असा एक धागा,

जो रक्ताची नातीच काय

पण परक्यालाही खेचून आणतो

आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो

आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर

त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर.